
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण यामध्ये ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाचा लेखाजोखा असलेले पत्रक नागरिकांच्या घरापर्यंत तथा प्रतिष्ठान पर्यंत घर-घर अभियान अंतर्गत पोहोचविण्याचे काम भाजपचे शहरातील पदाधिकारी,नगरसेवक करीत आहेत.
या वेळेस डॉ.विलास कविटकर (उपाध्यक्ष-ओबीसी संघर्ष समिती भाजपा) व गणेश पिंगे (माझी नगरसेवक),प्रवीण पटूकले (शहर उपाध्यक्ष),रमेश सदाफळे (बूथ प्रमुख ),राहुल पंड (विस्तारक ),पंकज श्रीवास्तव,प्रथमेश हाडोळे,विवेक झाडे,सौरभ जुनगरे यांनी सुर्जी विभागात घर- घर अभियान राबविले आहे.