
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी
वासू पाथरे
अमरावती (चिखलदरा) : चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणारी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा डोमनबर्डा इमारतीचे नैसर्गिक आपत्तीमुळे २०२१ साली कोसळून नुकसान झाले.
जिल्हा परिषद शाळेच्या १ ते ५ वर्गातील शिकणाऱ्या मुला-मुलींसाठी दोनच खोल्या होत्या.आता त्यातील एक वर्ग खोली २०२१ साली निसर्गाच्या आपत्तीमुळे कोसळलेली असून मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शासनाला मुख्याध्यापक यांनी प्रस्ताव सादर करून त्याचा वारंवार पाठपुरावा घेऊन सुद्धा शासनाने दखल घेतली नाही.आदिवासी मुला-मुलींची शैक्षणिक नुकसान लक्षात घेता तात्काळ वर्ग खोल्या (बांधकाम) उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्याध्यापक गणेश झेंगुजी तोटे यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी शासनाला केली आहे…