
तालुक्यातील गावात पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी (५जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासात १६.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून दुपारीही जोरदार सरी बरसल्या. यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे, तर पेरलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे.
भोकरदन जाफराबाद मध्ये पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी (५जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासात १६.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून दुपारीही जोरदार सरी बरसल्या. यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे, तर पेरलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी अशी (मि.मी.) जालना – ९.६० (७४.००), बदनापूर – ०.९० (८९.७०), भोकरदन - २१.००(८२.००), जाफराबाद ३३.०० (१०१.००), परतूर – १७.३० (६९.१०), मंठा – ६.३० (६७.६०), अंबड – ३१.७० (१११.३०), घनसावंगी – ९.१० (८१.१०) मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२.८० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, वालसंवगी, धावडा, विझोरा, जाईदेव, पारध.पिंपळगाव रेणुकाई आदी शिवारात जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी, नाले ओढ्यांनाही पाणी आले होते.दरम्यान, या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी याअगोदरही पेरणी केली होती. मात्र, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षा शेतकऱ्यांना होता. बुधवारच्या पावसामुळे ही प्रतीक्षा आता संपली आहे.