
श्री स्वामी समर्थ मंदिरात 40 लक्ष विकास कामाची भूमिपूजन..
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
मुखेड:– गुरुपौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नागेंद्र मंदिर मुखेड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आ.डॉ. तुषार राठोड, व त्यांच्या पत्नी सौ ज्योत्सनाताई राठोड यांच्या हस्ते महाआरतीचा आयोजन करण्यात आले असून व मंदिरातील 40 लक्ष विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून येत्या काळामध्ये निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिले.
सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, कृ ऊ.बा.चे सभापती खुशालराव पाटील उमरदरी कर, भाजपाचे वीरभद्र हिमगिरे, अशोक गज्जलवाड, चंद्रकांत गरुडकर, शंकरांना पोतदार, राम पत्तेवार, किशोर चव्हाण, गोविंद घोगरे, शंतनू कोडगिरे, करण रोडगे, जगदीश बियाणी, अनिल जाजू, दीपक मुक्कावार, शारदा ताई हिमगिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजन रक्तदान शिबिराचे आ. डॉ. राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक भाविकांनी गुरुपद घेतले,विवाह नोंदणी,प्रश्न उत्तर, वास्तुदोष, गर्भसंस्कार, असे अनेक स्टॉल उभारून दिवसभर विनामूल्य मार्गदर्शन केले. गेले यावेळी शिवा मुद्देवाड प्रमोद यादव पवन ठाकूर, अमोल मडगुलवार, संख्येने भक्तगण पुरुष -महिला उपस्थित होते व श्री स्वामी समर्थ केंद्र कडून मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले…