दै. चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदगाव :- मारतळा येथून जवळच असलेल्या नांदगाव येथील वीजपुरवठा तीन दिवसापासून खंडित झाला असून वारंवार सूचना तक्रारी देऊन नागरिक कंटाळले आहेत.विज पुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठा व दळण आणि भ्रमणध्वनी चार्जिंग करणे अवघड झाले आहे जनावरांना पाणी मिळत नाही माणसे पाण्याअभावी तरसत आहेत तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या नांदगाव येथील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याबद्दल कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कशामुळे विद्युत पुरवठा बंद होत आहे आणि कोणती तांत्रिक अडचण आहे. ती दूर करून नांदगाव येथील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी अभियंत्याकडे करण्यात आली असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे…
