
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक ८ जुलै २०२३ रोजी देगलुर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी देगलुर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले हवरगाव येथे आमदार विकास निधी मधून २० लक्ष रुपयाची नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर अडचणी दूर करण्यात येईल असे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी नागरिकांना सांगितले त्यादरम्यान मौजे चैनपुर येथे विविध विकास कामांचा आढावा घेतला तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून चैनपूर येथील लक्ष्मीमाता मंदीर समोरील सभा मंडपाच्या बांधकामांचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. आणि गावकऱ्यांच्या समस्या संबंधित संवाद साधला. चैनपुर गावातील नागरिकांची सभा मंडप व्हावे म्हणून अनेक दिवसांपासून मागणी करण्यात आली होती. ती मागणी लक्षात घेता काल दि ८ जुलै रोजी चैनपुर येथे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते, प्रशांत पाटील आचेगावकर बसवराज पाटील वनाळीकर गजानन पाटील मुजळगेकर तसेच अनेक पदाधिकारी चैनपूर गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…