दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
मंठा सुरेश ज्ञा.दवणे
जालना मंठा जून २०१९ पर्यंत भारतातील पाणीपुरवठा सुमारे ६५ टक्क्यांनी कमी झाला होता हे तुम्हाला माहीत आहे का? या गंभीर परिस्थिती आहेत, विशेषतः जसजशी आपली लोकसंख्या वाढत आहे आणि आपल्याला वाढण्यासाठी अधिक पाणी आवश्यक आहे. भारत विविध मार्गांनी या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु एक माणूस म्हणून तुम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच काही करू शकता. पहिली पायरी म्हणजे कमी पाणी वापरणे आणि दुसरी पायरी म्हणजे पावसाचे पाणी गोळा करणे मात्र शहरात व
ग्रामीण भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग या अतिशय चांगल्या योजनेबाबत जनजागृतीच झाली नसून, ही अत्यंत महत्त्वाची योजना कागदावरच राहिली आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागांतील सर्व शासकीय इमारतीमध्ये राबविता येऊ शकते. मात्र त्याकडे यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होत आहे.
उन्हाळ्याचे दिवस आले की दरवर्षी शहरात तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मे महिन्याच्या उत्तरार्थात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत; परंतु यावर रेन वॉटर हा अत्यंत कमी खर्चाचा व सोपा उपाय आहे. इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे खाली आणून त्याची साठवण करणे, गरजेनुसार हे पाणी उपयोगात आणणे, अशी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची सोपी पद्धत आहे.
