
दैनिक चालु वार्ता
बीड अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे नवनिर्वाचित मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे ढोल ताशे व १५०० मोटारसायकल रॅलीद्वारे जंगी स्वागत…
ना. मुंडेंच्या स्वागतासाठी जेष्ठांसोबतच तरुणाईचा अविस्मरणीय असा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला…
अंबाजोगाई(प्रतिनिधी:– महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले. सरकारमध्ये सामील होऊन कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच ते अंबाजोगाई शहरात दाखल झाले होते. अंबाजोगाई शहरात दाखल होताच यशवंतराव चव्हाण चौक या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यशवंतराव चव्हाण चौक ते भगवान बाबा चौक या मार्गावर अंबाजोगाईच्या इतिहासात अभूतपूर्व अशी दुचाकी व चारचाकी वाहनांची भव्यदिव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या स्वागत रॅलीमध्ये जेष्ठांसह तरुणाई देखील प्रचंड अशा प्रमाणात व उत्साहात सहभागी झाल्याची दिसून आली.
अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तथा अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये दीड हजार ते दोन हजार नामदार धनंजय मुंडे, राजकिशोर मोदी व तानाजी देशमुख यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व मोठया उत्साहात उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण , राजकिशोर मोदी यांच्यासोबत माजी आमदार संजय दौंड, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख ,दत्ता पाटील,विलास सोनवणे, राजपाल लोमटे,प्रा वसंत चव्हाण, प्रकाश सोळंकी, ऍड विष्णुपंत सोळंके, संकेत मोदी,सरपंच गणेश देशमुख , राजाभाऊ औताडे, महादेव आदमाने,शाकेर काझी, मनोज लखेरा,किशोर परदेशी,अमोल लोमटे,संतोष शिनगारे, दिनेश भराडीया,खालेद चाऊस, औदुंबर मोरे, समियोद्दीन खतीब, कचरूलाल सारडा, विष्णू पांचाळ, वजीर शेख, यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य स्वागत व सत्कार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला. क्रेनच्या साह्याने २०० किलो फुलांचा पुष्पहार ना धनंजय मुंडे यांना त्यांच्या स्वागतप्रसंगी घालण्यात आला.
महाराष्ट्राची बुलंद तोफ , बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तसेच नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब हे प्रथमच अंबाजोगाई शहरात आले असतांना त्यांचा अंबाजोगाई तालुका व शहरवासीयांच्या वतीने उत्स्फूर्त असे स्वागत व सत्कार करण्यात आला. या स्वागत व सत्कारास संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यातून नामदार धनंजयजी मुंडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने सामील झाले होते. हा ह्रदय सत्कार सोहळा भव्य अशा मोटारसायकल व चारचाकी वाहनांच्या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.
हा भव्यदिव्य सोहळा अंबाजोगाई वासीयांचे डोळे दिपवून टाकणारा असाच होता.घरातील हा स्वागत व सत्कार पाहून नामदार धनंजय मुंडे हे देखील भारावून गेल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यावरील प्रत्येक चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करून नामदार धनंजय मुंडे यांचे उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात येत होते. ना धनंजय मुंडे हे देखील अंबाजोगाई वासीयांच्या प्रेमाचा स्विकार अतिशय नम्रपणे स्वीकार करतांना दिसून येत होते.
या भव्य अशा स्वागत व सत्कार सोहळ्यास तमाम अंबाजोगाई करांनी भरभरून अशी साथ दिली. याप्रसंगी मनोज देशमुख सरपंच लोखंडी सावरगाव, निवांत देशमुख, मनोज देशमुख मा. सरपंच अंजनपुर कोपरा,बबन पाणकोळी , सचिन बेंबडे, सचिन जाधव, चंद्रकांत महामुनी,माणिक वडवणकर, गोविंद पोतंगले, अशोक जेधे, धम्मा सरवदे, वाजेद खतीब, सय्यद ताहेर, दत्ता सरवदे,रुपेश चव्हाण, शुभम लखेरा,हर्षवर्धन वडमारे, अशोक देवकर , रौफ बिल्डर, रफिक गवळी,महेश कदम, शुभम देवकर, अंकुश हेडे, जावेद गवळी, नेहरकर,अमजद पठाण,शेख मुक्तार, शरद काळे, आकाश कऱ्हाड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
*तालुका अध्यक्ष श्री तानाजी देशमुख यांनी मानले आभार*
धन्यवाद मानायला सुध्दा शब्द अपुरे पडतील असा भव्य दिव्य, नयनरम्य स्वागत सोहळा काल माननीय मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं अद्भुत स्वागत अंबाजोगाईत झालं त्यात ऊंट,ढोल ताशे,हलगी पथक, फटाक्यांची आतषबाजी, दुचाकी रॅली, अंबाजोगाई परिसरातील पंचक्रोशीतील मायबाप जनतेने दुतर्फी रस्ता पुर्ण पणे खचाखच शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी भरलेला. जे प्रेम दाखवलं त्याचे आभार हे शब्दात सुद्धा व्यक्त करणे अशक्य असा भव्य दिव्य नयन रम्य सोहळा आपल्या सर्वांमुळे शक्य झाला हृदयपूर्वक आभारुपी आपला ऋणी राहील असे मनोगत व्यक्त केले.