
प्रतिनिधी अंबड ज्ञानेश्वर साळूंके
पुणे शहर. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या दुचाकी वाहन चोर तसेच किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले असून यामध्ये सदर गुन्हेच्या अनुषंगाने सिंहगडरोड पोलीस तितकेच सतर्क असल्यांचे पाहायला मिळत आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रहिवासी असलेले इमारतीच्या केबलची वायरची चोरी करुन नागरिकांना जिवातांस धोका निर्माण करणाऱ्या दोन आरोपींच्या सिंहगड रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र प्रकाश देशमुख (वय३४) हेमराज शांताराम पाटील (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकांने केली. सदर आरोपींच्या कब्जांतून सुमारे ३०.०००/ रुपये किंमतीची वायर व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली ५०.०००/रुपये किंमतीची मोटर सायकल असा एकूण८०.०००/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार संदीप कर्णिंक सो.पोलीस उपायुक्त पुणे शहर प्रवीणकुमार पाटील सो. पश्चिम प्रादेशिक पुणे शहर सोहेल शर्मा सो. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ राजेंद्र गलांडे सो. सहायक पोलीस आयुक्त अभय महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर सो पो. नि. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम,पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार आबा उतेकर,संजय शिंदे देवा चव्हाण,स्वप्निल मगर आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला…