
डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्व हिमालयाच्या उंचीएवढे होते – अनिल मोरे..
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे जनक डॉ शंकरराव चव्हाण यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त लोहयात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन यावेळी शेकडो जणांनी या महारक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला शेकडोजणांनी रक्तदान केले.
देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दि.१४ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्याच एक भाग म्हणून दि. १४ जुलै २०२३ रोजी लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथील गोविंदराज मंगल कार्यालयात लोहा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सिने अभिनेते अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार, गणेश घोरबांड , काँग्रेसचे लोहा तालुका कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर,, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भगवानराव पाटील सुरनर, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, शहर उपाध्यक्ष संजय कहाळेकर, कैलास मोरे, विलास मोरे, सतार शेख, पांडूरंग शेटे, अशोक मेकाले, बाबासिंग ठाकूर , ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष माणिकराव देवकते , माजी नगरसेवक उत्तम महाबळे, माजी नगरसेवक बाबुमिया कुरेशी, माजी नगरसेवक पंकज परिहार, शरफौदीन शेख, सायाळचे सरपंच अण्णाराव पाटील पवार, पांडूरंग शेटे, , गजानन कळसकर, युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर, डी.एन . कांबळे , व्यंकट घोडके , गोवर्धन पवार, गणेश पवार, अंकुश पवार, नवनाथ पवार, रमजान कुरेशी, मारोतराव श्रीरामे, उध्दव पाटील मारतळेकर, विनायक वाके , सतीश पाटील ढाकणीकर (एनसी आय तालुकाध्यक्ष ),माजी पं.स. सदस्य डॉ.दत्ता . गवळी, किशनराव लोंढे , अर्जुन महाबळे, सुभाष कंधारे ,यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक, युवक उपस्थित होते.
यावेळी शेकडो जणांनी या महरक्तदान शिबिरांत सहभाग नोंदविला शेकडोजणांनी रक्तदान केले.
यावेळी पुढे बोलताना काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सिने अभिनेते अनिल मोरे म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांचें व्यक्तिमत्त्व चारित्र्य संपन्न व निष्कलंक होते त्यांनी देशाचे अर्थ नियोजन, संरक्षण, गृहमंत्री पदी उत्कृष्ट कार्य केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री , पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी विष्णूपूरी , जायकवाडी धरणासहीत अनेक धरणाची निर्मिती केली ते जलक्रांतीचे जनक होते असे अनिल मोरे म्हणाले.
तसेच यावेळी लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, शहराध्यक्ष सोनू संगेवार यांचे ही भाषणे झाली व सदरील कार्यक्रमांचे नियोजन अतिशय उत्कृष्ट पणे काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार व शहराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले होते.
सदरील कार्यक्रमास भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा सुर्योदय मन्याड फांऊडेशनचे अध्यक्ष एकनाथ दादा पवार, यांनी भेट दिली व त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार व शहराध्यक्ष सोनू संगेवार यांच्याशी चर्चा करून सदरील कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी, जिल्हाध्यक्ष सिरसाट, रामेश्वर पाटील पवार आदी उपस्थित होते…