
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – बांधकाम विकासक व बांधकाम व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत असणारे पुण्यातील श्री सुनिल श्रीधिर देशपांडे यांना वीररत्न बाजीप्रभू देशपांडे जीवन गौरव सन्मानपत्र व बाजीप्रभु देशपांडे यांचा पुतळा अर्पण करून सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय सी के पी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री समीरजी गुप्ते, सन्माननीय श्री अशोक देशपांडे, सन्माननीय श्री सुधाकर वैद्य यांचे शुभहस्ते प्रदान करणेत आले, अनेक ज्ञाती बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरदार सखाराम हरी गुप्ते कार्यालय ट्रस्टच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. श्री देशपांडे यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या ज्ञाती बांधवांच्या अविरत समाजसेवेची दखल घेऊन सराराम हरी गुप्ते कार्यालय ट्रस्टच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले. सीकेपी ज्ञाती बांधव तसेच इतर समाजाचे बांधव त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत…