मुंबई : शिवसेनेत दोन गट राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात मतदारच संभ्रमात जाणार आहेत. मागील वर्षी शिवसेनेत मोठं बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते.यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेना पक्ष आणि चिन्हही मिळवले. आता मात्र एक सर्व्हे समोर आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार शिंदे यांना पाठिंबा देणार की ठाकरे यांना देणार असा हा सर्व्ह आहे.
यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये 26.8 टक्के लोकांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. तर 19.1 टक्के लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे.
तसेच यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) 14.9 टक्के, राष्ट्रवादी (अजित पवार) 5.7 टक्के, शिवसेना (एकनाथ शिंदे) 4.9 टक्के, शिवसेना (उद्धव ठाकरे) 12.7 टक्के, मनसे 2.8 टक्के, वंचित 2.8 टक्के आणि इतर 10.3 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे जरी आता भाजप काही आकडे सांगत असले तरी त्यांना ही निवडणूक सोप्पी नाही.
तसेच मुख्यमंत्री म्हणून 8.5 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे. तर 21.9 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दर्शवली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यातच उद्धव ठाकरे यांना तब्बल 19.4 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. यामुळे लोकांनी उद्धव ठाकरे यांनाच स्वीकारले आहे. असे तरी या सर्व्हेमधून दिसून येत आहे.
