राजकीय व्यक्तींचा समावेश नसल्याने मराठा समाजाच्यावतीने हल्लाबोल…
लोहा कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी मराठा आरक्षणावर व दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहा कडकडीत बंदची हाक दिली होती त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी ही या बंदाला आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन हा बंद पाळला.
लोहा शहरातुन मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पेटली व सकल मराठा समाजाच्या मावळ्यांनी छञपती शिवरायांच्या जयघोष व मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच या जयघोषाने सकाळपासुन लोहा शहर दुमदुमून गेले .या मराठा समाजाच्या मोर्चात बारा बलुतेदार व आठरा पगड जातीच्या सर्व समाज बांधव सहभागी झाल्याने या मोर्चाकडे शहरातील नागरीकांचे लक्ष्य वेधल्या गेले.
मराठा क्रांती मोर्चाच्या लोहा शहरात निघालेल्या पदयाञेत भाजी मंडई परिसर ते छञपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एक राजकीय व्यक्ती समाविष्ट झाला नाही व आरक्षणाला पाठींबा पण दिला नाही त्यामुळे मराठा बांधवांच्यावतीने राजकीय व्यक्तीचा व राजकीय पक्षाचा समाचार घेत अनेकांनी मराठा नेत्यांवर टिकास्त्र सोडले व येणाऱ्या निवडणुकीत मतदानासाठी दारावर आल्यावर नक्कीच त्यांना आपल्या शब्दात उत्तर देणार यावेळी सर्वानी संकल्प केला .
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बंदाला पाठिंबा देणाऱ्या व्यापारी वर्गासह सर्वाचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने आभार मानले. यावेळी या मोर्चात विविध संघटनेचे पदाधिकारी , व्यापरी वर्ग , मराठा क्रांती मोर्चा , सकल मराठा समाज ग्रामीण भागातील युवा वर्ग अनेक गावांतील सरपंच , उपसरपंच ,पोलिस पाटील , ग्रामरोजगार सेवक , विविध संघटनेचे आजी – माजी पदाधिकारी , यांची प्रमुख उपस्थिती होती.
