आठ जण जखमी…
चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील घटना…
दै.चालु वार्ता
ता.चिखलदरा प्रतिनिधी
प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) :बजरंग मोती भास्कर यांच्या शेतात शेतकरी व शेतमजूर काम करत असताना १९ जुलै रोजी दुपारच्या वेळी विजांच्या कळकटासह पाऊस सुरू झाला.कडुलिंबाच्या झाडाखाली सगळ्यांनी आश्रयास थांबलेल्या मजूर व शेतकरी यांच्यावर काळाने घात घातला.वीज पडल्याने सुनील मोती भास्कर वय ३५ व निलेश बजरंग भास्कर वय १८ या काका-पुतण्या दोघे सुद्धा दगावले आणि त्यासोबत असलेले ८ मजूर सुद्धा जखमी झाले.
राजाराम जांभेकर वय ४५,आरती सोमेश जांभेकर वय २०,पार्वती भास्कर वय ४५,जानकी कासदेकर वय २४,सविता गुरुशंकर दांडेकर वय २८,होमपती लक्ष्मण मेटकर वय ५५,बजरंग मोती भास्कर वय ४५ असे जखमींचे नावे आहेत.त्यामधील ललिता बजरंग भास्कर यांची तब्येत चिंताजनक आहे.माहिती मिळेपर्यंत तहसीलदार व पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला….
