गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत CBSC व IBSC बोर्डातुन भार्गव करीअर अकॅडमीचा इयत्ता 5 वी मधील यशराज नामदेव देशमुख हा महाराष्ट्रात राज्यातुन प्रथम आला असुन यशराजचा सत्कार व सम्मान नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर – घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.
नांदेड येथे भार्गव करीअर अकॅडमी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या यशराज देशमुख सर्व कुटुंबासहित सत्कार करण्यात आला. व यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर – घुगे यांच्या हस्ते अकरा हजार रूपायांचा धनादेश देऊन यशराजला यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , उपशिक्षणाधिकारी बनसोडे , भार्गव राजे सह यशराजचे आई वडील व आजी – आजोबांची उपस्थिती होती.
