दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 25 जुलै केसनंद वाघोली पुणे….
पुणे वाघोली येथील केसनंद गावामध्ये आदर्श सरपंच दत्ता (आबा) हरगुडे यांच्यातर्फे मुलींकरिता मोफत कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात आले .
शोतोकोन कराटे दो स्पोर्टस असोसियेशन चे प्रेसिडेंट अमितकुमार ठाकूर तसेच वाईस प्रेसिडेंट विष्णू दहिरे यांच्या कराटे टीमच्या सहाय्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे.
दत्ता हरगुडे यांनी हा प्रकल्प बदलत्या युगात मुली व स्त्रिया सुरक्षित नाहीत व त्यांच्या वरिल हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुलींना कराटे व आत्मरक्षणाची कला शिकणे हे सध्या काळाची गरज बनली आहे याचा आढावा घेत सरपंच दत्ता हरगुडे यांनी केसनंद गावात मुलींकरिता मोफत कराटे प्रशिक्षण सुरू केले. विद्यार्थी, महिला वर्ग यांचा या उपक्रमात भरघोस प्रतिसाद मिळत आहे १०० हून अधिक मुली सध्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतात.
कार्यक्रमात बोलताना दत्ता हरगुडे (सरपंच) म्हणाले की आपण आपल्या पाल्यांना इतर गोष्टींचे प्रशिक्षण देत असतोच परंतु खरेखुरे संरक्षण मध्ये थोडं दुर्लक्ष होत . तरी आपण आपल्या पाल्यांना कराटे क्लासेस लावावीत जेणेकरून मुली, महिला घरा बाहेर सुद्धा स्वावलंबी व सुरक्षित राहतील असे ते म्हणाले .
उपक्रमयशस्वी होण्यासाठी शोतोकोन कराटे दो स्पोर्टस असोसियेशन सर्व प्रशिक्षक यांनी अनमोल सहकार्य केले
.*
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 25 जुलै केसनंद (वाघोली पुणे )
पुणे वाघोली येथील केसनंद गावामध्ये आदर्श सरपंच दत्ता (आबा) हरगुडे यांच्यातर्फे मुलींकरिता मोफत कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात आले .
शोतोकोन कराटे दो स्पोर्टस असोसियेशन चे प्रेसिडेंट अमितकुमार ठाकूर तसेच वाईस प्रेसिडेंट विष्णू दहिरे यांच्या कराटे टीमच्या सहाय्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे.
दत्ता हरगुडे यांनी हा प्रकल्प बदलत्या युगात मुली व स्त्रिया सुरक्षित नाहीत व त्यांच्या वरिल हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुलींना कराटे व आत्मरक्षणाची कला शिकणे हे सध्या काळाची गरज बनली आहे याचा आढावा घेत सरपंच दत्ता हरगुडे यांनी केसनंद गावात मुलींकरिता मोफत कराटे प्रशिक्षण सुरू केले. विद्यार्थी, महिला वर्ग यांचा या उपक्रमात भरघोस प्रतिसाद मिळत आहे १०० हून अधिक मुली सध्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतात.
कार्यक्रमात बोलताना दत्ता हरगुडे (सरपंच) म्हणाले की आपण आपल्या पाल्यांना इतर गोष्टींचे प्रशिक्षण देत असतोच परंतु खरेखुरे संरक्षण मध्ये थोडं दुर्लक्ष होत . तरी आपण आपल्या पाल्यांना कराटे क्लासेस लावावीत जेणेकरून मुली, महिला घरा बाहेर सुद्धा स्वावलंबी व सुरक्षित राहतील असे ते म्हणाले .
उपक्रमयशस्वी होण्यासाठी शोतोकोन कराटे दो स्पोर्टस असोसियेशन सर्व प्रशिक्षक यांनी अनमोल सहकार्य केले…