दैनिक चालू वार्ता
निलंगा तालुका प्रतिनिधी इस्माईल महेबूब शेख….
लातूर निलंगा : श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव येथे बालविवाह, हुंडाबंदी, मानवाधिकार, कौटुंबिक हिंसा या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
देवणी तालुक्यातील श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव ता देवणी व ग्रामीण विकास संस्था देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींचे बालपण जपूया! बालविवाहाला नाकारू या! माझे बालपण मला जाणू द्या सुंदर स्वप्ने साकारू या. विविध प्रकारच्या विषमता, लिंगभाव, स्व जाणीव, स्वतःच्या शरीराची ओळख व कौटुंबिक हिंसा, मानवाधिकार, बाल हक्क कायदे, नेतृत्व इत्यादी विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रामलिंग मुळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुशावर्ताताई बेळ्ळे, सत्यशिला सरवदे, पांचाळ संध्या, बिराजदार प्रिया आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजयश्री बोचरे यांनी केले तर आभार श्रीमती सरोजा शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण बिरादार शेरावती बिरादार विजयश्री बोचरे सरोजा शिंदे सत्यशीला सरवदे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
