
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – पुणे- दिघी F753 या राष्ट्रीय मार्गावरील माणगाव -दिघी या रस्त्यावर केळेवाडी ते निवाची वाडी या परिसरांत (ग्रा.पंचायत घोणसे ,ता. म्हसळा) M.S.R.D.A.कडून मागील दोन महीन्या पासून रस्त्याचा सुमारे २० फूट X१५ फूट अंतराचा तुकडा काढून ठेवला आहे. त्यामुळे कृत्रिम खड्डा झाला आहे तेथेच अपघाताची भिती वाढत आहे.ह्याच परिसरांतील हा तुकडा टेस्टींग साठी काढला का? ह्याचा खुलासा प्रशासन करीत नसताना, पर्यटक मात्र ४-५ महिन्यांत अपघात झाला नाही म्हणून M.S.R.D.Aने खोदला “मौत काँ कुंबँ ” खोदलाआसण्याची शक्यता वर्तवून आपला विरंगुळा करीत आहेत. हाय खड्डा तात्काळ भरावा अशी मागणी पुबे येत आहे
अतीशीघ्र उतार आणि तीव्र वळणावर या ५०० मीटर रस्त्यावर सदोष बांधकाम आसल्याने गेले काही वर्ष सातत्याने अपघात होत होते. M.S.R.D.A.कडून झालेल्या काँक्रीटीकरणा नंतर या अपघात प्रवण क्षेत्रांत अती गंभीर ते मध्यम स्वरूपाचे सुमारे ३० अपघात झाले आहेत, यामध्ये ६-७ मयत, २० गंभीर जखमी, ३० मध्यम स्वरुपांचे जखमी झाले आहेत. सर्व सामान्यांचे आभ्यासांतून अपघाताची सकृत दर्शनी कारणे म्हणजे संपूर्ण रस्त्याचे (माणगाव ते दिघी) बांधकाम संदोष आहे आशी चर्चा आहे.अपघातग्रस्त भागात घोणसे घाटांतील लहान पूल (स्लॅबड्रेन) जवळील धोकादायक वळणाला योग्य सुपर इलीव्हेशन नसल्याने, माणगावहून अवजड वजन घेऊन येणाऱ्या वाहन चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटते व वाहन न वळण घेता ते वळणाच्या बाहेरील बाजूस जाऊन दरीत कोसळते किंवा आताच नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीवर आदळते त्यामुळे या ५०० मीटर आंतरात वाहनांचे गंभीर अपघात होतात. माणगाव ते दिघी या ५४ कि.मी.रस्त्याचे बांधकाम संदोष आहे, या रस्त्याला सुमारे ५४ हजार कि.मी. अंतराच्या खोलवर भेगा पडल्या आहेत,अनेक भागांतील रस्ता खचला आहे.अशी स्थिती आहे. हा सर्व रस्ता सिमेंट कॉक्रीटचा आहे या फुटलेल्या भेगांतून पाणी मुरत आसल्यामुळे येत्या काही वर्षांतच संपूर्ण रस्ता मोठया प्रमाणांत उखडला जाणार असल्याचे जाणकरांचे मत आहे. vरस्त्याचे ठेकेदाराचे वॉरेंटी पिरीयड मध्येच परफॉर्मन्स चेक करून तात्काळ दुरुस्त करून घ्यावा ही स्थानिक नागरिकांची मागणी आहे रस्त्यावरील सर्व अभियंत्यांची चौकशी होणे हे सुद्धा क्रमप्राप्त आसल्याची मागणी माजी सभापती महादेव पाटील लावून धरणार आहेत.