
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:जी माणसं स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी आणि सर्वांगीण विचार करतात ती माणसं समाजासाठी कायम वंदनीय ठरत.तर निष्पृहपणे केलेल्या कामावर सर्व काही अवलंबून असून निष्ठापूर्वक काम करणारे कार्यकर्ते हे लोकांच्या मनात रुंजी घालत समाजात एक वेगळी ओळख निर्माण करणारे दिपक कांबळे रामपूरकरांना कुठल्याही राजकीय वारसा नसतांना सामाजिक बांधिलकी जोपासून सदैव जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या कृतिशील दमदार युवा नेतृत्व अन् देगलूरचे भूमिपुत्र दीपकभाऊ रामपूरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी देगलूर-बिलोली मतदारसंघ शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाला आहे.
देगलूर तालुक्यातील रामपूर येथील दिपक कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी व गोरगरीब कुंटुबातील एक असामान्य माणूस आहे. अतिशय जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्याने लहानपणापासून शिक्षण घेण्यासाठी देखील प्रचंड संघर्ष करावा लागला. घरोघरी दुध वाटप करुन ५ वी ते १० पर्यंतंचे शिक्षण पुर्ण केले.त्यासाठी पाच किलोमीटर दैनंदिन पायपीट करावी लागायची.पुढील शिक्षणासाठी देगलूर गाठले.परंतु रुमचे भाडे द्यायला पैसे नसल्याने ५० रुपयांवर मजुरी देखील केली.आता पुढे काय? असा प्रश्न डोळ्यासमोर सदैव गांभीर्याने पुढे येत होता.
परंतु एखाद्या क्षेञात काम करण्याची खुनगाठ मनाशी बांधल्या नंतर त्यात जीव ओतून समर्पीत भावनेने स्वताःला झोकून देणे गरजेचे असते..अँक्टिव्हेपे मँनेजमेंट सर्व्हिसेसची धुरा सांभाळतांना मी यशस्वी होणारच अशी ध्येयाचे शिखर गाढण्याची अजोड जिद्द बाळगून प्रामाणिक निष्ठेने अविरत परिश्रम घेतले.. त्याच कठोर मेहनतीचे फलित म्हणून आज माझी कंपनी गुणवत्तापुर्ण दर्जेदार सेवा देण्यात आठरा राज्यात अव्वल ठरतेय.तसेच माझ्या कंपनीत २२०० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने याचा मला सार्थ अभिमान अन् आनंदही असल्याची निखळ भावना कंपनीचे सर्व्हेसर्वा तथा आजच्या पिढीसाठी एक आदर्शवत उद्योजक असणारे कंपनीचे एम.डी.दिपक कांबळे रामपूरकर यांनी व्यक्त केलीय..
देगलूर- बिलोली हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला असून या मतदारसंघात नऊ जिल्हा परिषद गट आहेत. तर १८ पंचायत समिती गण सह तीन नगरपालिकांचा सामावेश आहे.मात्र येथील सुशिक्षित बेरोजगार युवक कामाच्या शोधात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात आपल्या कार्मभूमीला सोडून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याचे चित्र आहे.तर केंद्र सरकारच्या ध्येय धोरणानुसार वाढती महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून अजूनही शेतकऱ्यांच्या मुलाला असेल अथवा सामान्य बहुजन कुंटुबियातील व्यक्ती असेल बहुतांशी राजकीय संधी मिळाली नसून प्रस्थापितांच्या वारसदारांना आणि आमदार, खासदारांच्या मूलालाच राजकीय संधी मिळते हे वास्तव चित्र उभ्या महाराष्ट्रात असून कोणताही राजकीय पक्ष घ्या,निष्ठवंत कार्यकर्त्यांची आठवण फक्त निवडणुकीताच त्यानंतर ” तू कोण अन् मी कोण ” अशी भूमिका राजकिय लोकप्रतिनिधी घेत असल्याचे रोखठोक भूमिका दिपक रामपूरकरांनी मांडली.
दरम्यान या देगलूर बिलोली मतदारसंघातील तमाम सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला राज्याचा विधानसभा सभागृहात पाठविण्याची भूमिका येथील जनतेची असून बौद्ध समाजाला देखील लोकप्रतिनिधी होण्याची संधी अद्याप मिळाली नसल्याने आत्ता राजकीय पक्ष कोणताही असो थेट मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेत या मतदारसंघातील समस्य व विशेष म्हणजे कोणत्याही पक्षा विषयी मतदारांची भूमिका काय ? हे लक्षात घेवूनच हंगामी निवडणूक देगलूर – बिलोली मतदारसंघातून लढविणार असल्याची आशावादी मत उपस्थिती पत्रकारसमोर दिपक रामपूरकरांनी व्यक्त करत 5 ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध युवाकीर्तनाकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर,आळंदी ( भांबोली, चाकण, पुणे ) यांच्या भव्य कीर्तन सोहळ्यास उपस्थिती राहावे असे आवाहन दिपकभाऊ रामपूरकर मित्र मंडळाचे प्रशांत ढगे,दत्ता ढगे,विलास इंगोले यांनी केले आहे.