
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):आज देगलूर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडी संदर्भात देगलूर येथील शासकीय विश्रामगृह येथे देगलूर शहर व तालुक्यातील इच्छुक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या सदर निवड प्रक्रियेत ७० इच्छुकांनी सहभाग नोंदवला. भारतीय जनता पक्षात इच्छुकांची गर्दी पाहता आगामी कालावधीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा विधानसभा व सर्वच निवडणुकांत जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल यात कुठलीही शंका उरत नाही. आज देगलूर येथे पडलेल्या निवड प्रक्रियेप्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माजी क्षआमदार गजाननराव घुगे साहेब, भाजप प्रदेश सचिव देविदासजी राठोड, माजी आमदार सुभाषजी साबणे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ.माधवराव उच्चेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकटे संतोष पाटील येरगीकर, शहराध्यक्ष अशोक गंधपार, नामदेव थडके युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, युवा मोर्चा* ग्रामीण *अध्यक्ष पंकज देशमुख, शिवकुमार देवाडे, माजी नगसेवक प्रशांत दासरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील शेळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस अनिल पाटील खानापूरकर, उत्तमराव कांबळे, आत्माराम पाटील, संतोष पाटील, शिवराज पाटील माळेगावकर, बबन पाटील गोजेगावकर, रवी पाटील नरंगलकर
यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी अन्य मान्यवर मोठ्या संख्येने व प्रामुख्याने उपस्थित होते. !