
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- कंधार-लोहा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांचे जावाई श्री. प्रविणकुमार पडवळ महाराष्ट्र राज्याचे सह.पोलीस आयुक्त यांना आतापर्यंत केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. प्रविणकुमार पडवळ हे सध्या मुंबई येथे वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रविणकुमार पडवळ यांनी नांदेड येथेही उलेखनीय सेवा बजावली आहे. तसेच अकोला, नाशिक येथे सेवा बजावल्या नंतर आता ते मुंबई येथे कार्यरत आहेत. नांदेड जिल्हाचे ते जावाई असल्यामुळे सर्व नांदेड जिल्हातील जनतेतून त्यांचे कौतुक केले जात आहे तसेच राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा सर्व नांदेड जिल्हाला अभिमान आहे.पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.