अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालया कडून फिर्याद नोंदविण्यास दिरंगाई…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : येथील तहसील कार्यालयातील गोपनीय दस्ताऐवज गहाळ झाल्याने त्याबाबत चौकशी करण्याचे पत्र तत्कालीन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी २२ मार्च २०२३ ला पोलीस निरीक्षक दीपक वानखडे पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी यांना दिले होते.अंजनगाव सुर्जी पोलीसांनी याबाबत सखोल चौकशी केली असता तहसील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी दोषी असल्याचे चौकशी अंती निदर्शनास आले.
तहसील कार्यालयातील काही गोपनीय अहवाल दस्तऐवज सन २०१९ ते २० व २०२० ते २१ या कालावधीतील गहाळ झाल्याचे निदर्शनास आले असून या कार्यकाळात आस्थापनेवर कार्यरत महीला कर्मचारी यांच्या कार्यरत काळात गोपनीय अहवाल कार्यालयातून गहाळ झाल्याचे पत्र तत्कालीन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन यांना दिले.याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे पत्रात नमूद केले होते.त्यानुसार अंजनगाव सुर्जी पोलीसांनी याबाबत सखोल चौकशी केली असून गोपनीय अहवाल गहाळ प्रकरणात तहसील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी दोशी असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.चौकशीचा अहवाल अंजनगाव सुर्जी पोलीसांनी तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी यांना दिला असून पुढील चौकशी करिता तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांच्या मार्फत पोलीसांमध्ये फिर्याद नोंदविणे आवश्यक असून पुढील कार्यवाही पोलीसांना करता येईल.परंतु तहसील कार्यालयाकडून फिर्याद नोंदवण्यास दिरंगाई होत असून दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याकरिता तर फिर्याद नोंदविण्यास दिरंगाई होत नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर दस्तऐवज गहाळ प्रकरण तहसील कार्यालयामार्फत आमच्याकडे आले त्याची पूर्ण शहानिशा झाली परंतु तहसील दार यांच्याकडून कुठलीच फिर्याद आली नाही फिर्याद आल्यानंतर आम्ही सदर महिला ना ताब्यात घेऊ.
पोलीस निरीक्षक दीपक वानखडे पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी…
मी आता या आठ दिवसातच चार्ज घेतलेला आहे मला त्याची पूर्णपणे माहिती नाही ती माहिती आल्यानंतर प्रकरण हाताळणार.
ऋणय जाकुलवार तहसीलदार अंजनगाव सुर्जी
