
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 19 ऑगस्ट राजपूर खुर्द (नवी दिल्ली )
नेशनल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जी एल गुप्ता यांनी आज बैठक घेऊन नेशनल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निखिल विजय बेद यांची एक मताने निवड करण्यात आली.
या बैठकीत पक्षांच्या वृध्दी साठी व पुढील नियोजीत कार्यक्रमा विषयी राष्ट्रीय अध्यक्ष जी.एल.गुप्ता यांनी मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष निखिल विजय बेद यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रा मध्ये येणाऱ्या सर्व लोकसभा, विधानसभा आणी महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये नेशनल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ही पार्टी प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार असल्याची माहीती नेशनल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चे नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री निखिल बेद यांनी दिली.