
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
५०० राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांसाठी पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या..
म्हसळा – म्हसळा तालुक्यातील मॉडेल स्कूल रा. जि. प आदर्श शाळा खरसई मराठी शाळेने एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शाळास्तरावर करण्यात आले.
म्हसळा तालुक्यातील बनोटी गावचे हरी अंबाजी म्हात्रे यांचे सुपुत्र भारत हरी म्हात्रे सेवा ११ वर्ष, पोस्टेड बंगाल आणि कुमार विनायक हरि म्हात्रे सेवा ९ वर्ष पोस्टेड पंजाब दोन्ही बंधू यांची योगायोग उपस्थित खरसई मराठी शाळेत लाभली.यावेळी शालेय विद्यार्थीनी आरती ओवाळून राखी बांधली, उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना. देशाबद्दल व सैनिकी भरती, प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन केले, सीमेवरील. प्रत्यक्षात कामाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी देशाच्या संरक्षण दलात कसं सहभागी व्हावे याबाबत हि सविस्तर माहिती दिली. फौजी यांचे शाळेत स्काऊट व गाईड पथकाने आनंददायी पध्दतीने स्वागत केले.५०० राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांसाठी पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या.
भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जीवांसाठी म्हसळा तालुक्यातील केंद्र वरवठणे, शाळा खरसई मराठी मधील खरसई शाळेतील भगिनी छोट्या- छोट्या चिमुकल्यांनी राखी बनविणे सुंदर उपक्रम हाती घेत एक शालेय वातावरणात विद्यार्थ्यांनी चांगलाच सहभाग घेतला. आपल्या देशात सुरक्षित राहू शकतो ज्यांच्या मुळे ते म्हणजे. संरक्षण दलात काम करणारे सैनिक जिवाची बाजी लावणार्या देश सेवा करणारे आपले बांधव, डोळ्यांत तेल घालून काम करणाऱ्या रात्रंदिवस मेहनत करून महत्वाचे भाग म्हणजे आदर्श सैनिक यांना येऊ घातलेल्या रक्षाबंधन च्या सणाचे निमित्ताने योग साधून शालेय मुलींनी राखी बनविण्याचे काम हाती घेऊन डाकविभाग मार्फत आज १८ आॅगस्ट २०२३ रोजी राख्या सीमेवर सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या.
यावेळी या उपक्रमासाठी बहुमोल मार्गदर्शन श्री जयसिंग बेटकर सर यांनी केले. तसेच मार्गदर्शक संदिप शेबांळे सर यांनी केले, राम थोरात सर, मुख्याध्यापिका शारदा कोळसे मॅडम यांनी राखीचे व सणाचे महत्व सांगितले.
शाळा समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दौंड साहेब, विस्तार अधिकारी जगदीश घोसाळकर सर, केंद्र प्रमुख किरण पाटील सर नोडल ऑफिसर कौचाली सर, साधन व्याक्ती दिपक पाटील सर, अनिल बेडके, भोनकर सर, पैलकर सर , नंदकुमार जाधव सर,प्रकाश कोठावले, विचारे अण्णा यांनी या उपक्रमासाठी महत्वपूर्ण शुभेच्छा दिल्या.