
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे…
जालना (मंठा) गटसाधन केंद्र मंठा येथे क्रीडा शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री अशोक सोळंके साहेब, गट समन्वयक के जी राठोड, मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ,प्रा रमेश शिंदे यासह मंठा तालुक्यातील क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते, मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023 ची सुरुवात 24 ऑगस्ट 2023 पासून बुद्धिबळ या खेळाने सुरुवात होणार आहे, यासह फुटबॉल,कुस्ती,क्रिकेट, कॅरम,हॉलीबॉल,कबड्डी,खो खो, योगा,व मैदानी स्पर्धा मध्ये धावणे, गोळा फेक,थाळीफेक,भालाफेक, हातोडा फेक, लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, तिहेरी उडी, 100 बाय 400 रिले, यासारख्या अनेक स्पर्धा, 14 वर्षे मुले मुली, 17 वर्षे मुले मुली, व 19 वर्षे मुली अशा विविध वयोगटामध्ये तालुकास्तरावर घेतल्या जाणार आहे! सदरील बैठकीत जास्तीत जास्त मंठा तालुक्यातील खेळाडू व सर्व माध्यमाच्या शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ यांनी केले, तर गटसमन्वय के जी राठोड यांनी मंठा तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आलेख सर्वांच्या समोर मांडला तर क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी यांनी खेळाडूची ऑनलाईन नोंदणी,खेळातील नवीन बदललेले नियम, क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली तर यावर्षी मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, माध्यमिक, उच्च माध्यमिक यासह इंग्रजी शाळांचा सुद्धा 100% सहभाग नोंदवला जाईल व मंठा तालुक्यातील सर्व स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातील अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी अशोक सोळके यांनी दिली, सदरील क्रीडा शिक्षक बैठकीचे आभार प्रदर्शन प्राध्यापक रमेश शिंदे यांनी केले, यावेळी प्रसाद पालवे, अर्जुन थोरात, के पि कादे, मगर पि पी, तोगरे एस एम, संदीप चव्हाण, भुजंग एस एस, अच्युत राठोड यासह तालुकातील अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते…