कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा – शंभू मालठाने उपजिल्हा प्रमुख,प्रहार…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक होत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.
प्रहारचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाने यांच्या नेतृत्वात शेकडों प्रहार कार्यकर्त्यांसमवेत शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी (दि.२२) मंगळवार रोजी तहसीलदारांना घेराव घातला.अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये सरासरीहून कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले.या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून ठोस उपाययोजना कराव्या,पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या,शहानूर नदी पात्रात अवैध्य रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा,शेत परिसरातील ट्रांसफार्मरची दुरुस्ती करून जीवितास धोका उद्भवणाऱ्या खाली आलेल्या विद्युत वाहक तारा सुधारणा कराव्या तसेच शेतकऱ्यांना सिंगल फेज विद्युत पुरवठा उपलब्ध करून सोयीयुक्त विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांनी शेत परीसर समवेत मानवी वस्तीत धुमाकूळ घातल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अश्या विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालय येथे प्रहार कार्यकर्त्यांनी तहसीलदार ऋणय जक्कुलवार यांना निवेदन दिले.
