गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्पेशल बाब म्हणून मंजूर करून आणलेल्या २०कोटींच्या निधीतून नगर सेवक तथा न.पा.चे उपाध्यक्ष दता वाले यांनी अमृतनगर मधील नरंगले ते नाईकवाडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यामुळे या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
लोह्यातील ‘अमृतनगर’चा भाग हा प्रभाग क्रमांक एक मध्ये असून या भागाची निर्मिती जवळपास ३० ते३५ वर्षांपूर्वी झाली आहे. पण या भागाकडे कोणत्याही नगरसेवकांनी लक्ष दिले नव्हते. या भागातील नरंगले ते नाईकवाडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली होती. दरम्यानच्या कळात या रस्त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती हरकर यांनी डांबरीकरण करून दिले होते.त्यालाही आता पंधरा वर्षांचा कालावधी उलटून गेला असून या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. तसेच जड वाहनांच्या ये – जा नी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून उखडला गेला होता. जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
*न.पा.उपाध्यक्ष दत्ता वालेंनी घेतली दखल*
अमृतनगर भागातील नागरिकांची होणारी ही गैरसोय तातडीने दूर करून निधी मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.पण, दरम्यानच्या काळात राजकीय सिथीत्यंतर झाले. सत्ता बदल झाला. म्हणून काम रखडले गेले.
नंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर या प्रभागाचे नगरसेवक व न.पा.उपाध्यक्ष दत्ता वाले यांनी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खासदार निधीतून या रस्त्याच्या कामासाठीचा निधी उपलब्ध करून घेतला.
*खा चिखलीकरांनी दिला भरघोस निधी*
लोहा शहर लातूर मतदार संघात असूनही त्यांनी लोह्याचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून लोहा शहरातील विविध भागातील रस्त्यांसाठी, शादीखाना, सुशोभीकरण, बौद्ध विहार, नाल्या आदि कामांसाठी २०कोटीचा स्पेशल बाब म्हणून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निधी मंजूर करून घेतला.
या निधीतूनच प्रभाग क्रमांक एक येथील अमृतनगर व गोल्डन सिटी मधील व इतर भागातील रस्त्याच्यासह विविध कामासाठीचा निधी नगरसेवक तथा न.पा.उपाध्यक्ष दता वाले यांनी उपलब्ध करून घेतला आहे. अमृतनगरमधील सदर रस्त्याच्या काम छत्रुघ्न डांगे यांच्या कडे असून आज दि.२२ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
यावेळी दता वाले,सर्वश्री. वाडीकर , बाबुराव राठोड, मधुकर बडवणे,चॉंद पटेल, संतोष फाजगे, परसराम दैठणकर, दिगंबर टोकलवाड, बालाजी हिवरे,शिवकुमार वाडीकर, मामू कुरेशी, सुभाष गोरकट्टे , शिवा नरंगले प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे.ई. बलराज सोमवंशी, छत्रुघ्न डांगे, राजू सरोदे यांच्यासह अमृतनगर मधील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
