
दै.चालु वार्ता
श्रीकांत नाथे उपसंपादक अमरावती
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : स्व.राजू कतोरे व स्व.उमेश माकोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जलजला गणेशोत्सव मंडळ व शिवभक्त ग्रुपच्या वतीने (दि.२५) शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य रक्तदान शिबिराचे दुसरे वर्ष असून रक्तदान हे सर्वोत्तम दान आणि श्रेष्ठ असून मानवतेसाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात रक्तदान केलेच पाहिजे.एखाद्या व्यक्तीने दिलेले रक्त एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवते आणि रक्तदात्यासाठी याहून अधिक आश्वासक काहीही असू शकत नाही.त्याकरिता या भव्य रक्तदान शिबिराला योजीलेल्या वेळेत संगत संस्थान बारगणपुरा अंजनगाव सुर्जी याठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील होऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे.