
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : नगरपरिषद व लोकजागर संघटना अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या वसुंधरा मियावाकी प्रकल्पाला (दि.२३) बुधवार रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी भेट दिली.
जापानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी सादर केलेल्या तंत्राचा वापर करून अंजनगाव सुर्जी येथे २० हजार स्वे.फुट मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या मियावाकी जंगल पथदर्शी प्रकल्पामध्ये १५ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४ हजार वन औषधी वृक्षांची लागवड पर्यावरण प्रेमींच्या हस्ते करण्यात आली होती.या मियावाकी जंगल प्रकल्पामध्ये आवळा,बेल,अर्जुन,अग्निमाद्य,नागद्रोण,चिंच,फणस,जांभूळ,बिहाडा,पुत्रजीवा,फापडा,हत्ती फळ,हड्डीजोड ह्यासारखे अत्यंत दुर्मिळ सातपुड्याच्या जंगल परिसरात उपलब्ध वनस्पतीची लागवड करून एका वर्षात १५ ते २० फूट उंच विकसित मियावाकी जंगल प्रकल्पाचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी कौतुक व्यक्त केले.
यावेळी वसुंधरा मियावाकी प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी नगरपरिषद व लोकजागर संघटनेसोबत वृक्ष लागवड करून निर्माण करण्यात आलेल्या स्तुतीमय उपक्रमातून नागरिकांना संदेश दिला आणि शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य देण्याबाबत आश्वासित केले.तसेच यावेळी दर्यापूर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,अंजनगाव सुर्जी तहसीलदार ऋणय जक्कुलवार,न.प.अंजनगाव सुर्जी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,बीडीओ अंजनगाव सुर्जी विनोद खेडकर,उपविभागीय अभियंता जलसंधारण (जि.प.ल.पा.)अंजनगाव सुर्जी तसेच लोकजागर संघटनेचे सदस्य व पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.