
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :शहर येथील तहसील कार्यालय पुरवठा विभाग अंतर्गत येणारे नागरिकांचे समस्या व तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून असे आहेत की नवीन राशन कार्ड बनविण्यात दिल्यास एक ते दीड वर्ष व नवीन नाव नोंदणी समाविष्ट व कमी करणे ऑनलाइन सेटअप साठी कमीत कमी चार ते सहा महिने असा वेळेचा विलंब होत आहे. अशा या वेळेच्या समस्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे व नागरिकांनच्या घरातील ज्या व्यक्तींचे नाव राशन कार्ड मध्ये नाही असे नवीन नाव नोंदणी समाविष्ट केल्यास त्या व्यक्तींचे नाव लवकर ऑनलाइन सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांच्या मशिनात लवकर ऑनलाइन सेटअप येत नाही त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही व तसेच कार्यालयात नवीन राशन कार्ड बनविण्यात दिल्यास एक ते दीड वर्ष पर्यंत नवीन राशन कार्ड मिळत नाही व नाव कमी करून पण लवकर मिळत नाही. विनाकारण वेळेचा अडथळा निर्माण केला जात आहे. या समस्यामुळे नागरिकांची मानसिकतेचा छळ होत आहे त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहे. ही नागरिकांची सर्व भेडसावणाऱ्या व त्रासदायक समस्या व तक्रारींचा आढावा घेत सामाजिक कार्यांच्या आघाडीवर असलेली संस्था नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो च्या वतीने तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेब ऋणय जक्कुलवार यांना निवेदन देण्यात आले. व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली नागरिकांची ही तक्रारी व समस्या समजून जो विनाकारण वेळेचा अडथळा निर्माण होत आहे तो दूर करून लवकरात लवकर राशन कार्ड ची सेवा देण्यात यावी.व दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावे.
निवेदन देतांना अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिल शामलाल गौर पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा उपाध्यक्ष गजानन खंगार,जिल्हा कार्यध्यक्ष गणेश भाऊ वानखडे,जिल्हा सचिव मंगेश चिलात्रे,सदस्य कपिल संजय उसरे,मोहम्मद सुफियान कुरेशी,श्रीकांत चिलात्रे,शुभम कहार,संजय धारस्कर,महादेवराव बाळे,अनिल काळे,देवानंद महल्ले,नितीन निंबोकार,संगीताताई मेन व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.