
दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर); दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अणि नमन करण्यासाठी ग्राम पंचायत शेवाळच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद वीर यांच्या कुटुंबांचा समान म्हणुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गाव – शेवाळा च्या प्रांगणात शहीद जवान आणि हुतात्मांना आदरांजली अर्पण करणारे शिलाफलक लावण्यात आले.
गावातील ग्राम पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शेवाळा गावचे भूमिपुत्र सुभेदार व वीर सैनिक ग्रूप देगलूर चे तालुका अध्यक्ष श्री संतोष बाबुराव केंचे (सेवानिवृत) यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने घेण्यात आला. तत्पूर्वी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यात शाळकरी विद्यार्थी, गावकरी मंडळी, व गावातील वयोवृद्ध नागरिकांचा तसेच महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. देशभक्ति वरील गीत वाजवत प्रभात फेरी काढण्यात आली. विविध देशभक्तिवर घोषणांनी संपूर्ण शेवाळा गाव दुमदुमून गेला होता.
भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे मात्र देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागामूळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. हुतात्म्यांच्या विषयी आपले विचार मा. श्री. अशोक शिवराय पाटील यांनी आपल्या भाषणातून मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री सुभेदार संतोष बाबुराव केंचे (सेवानिवृत) यांचा ग्राम पंचायत शेवाळा तर्फे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री संभाजी हणमंतराव पा भालेवार (जि.प. केंद्रप्रमुख) यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त यावेळी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन गावच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असल्याचे गावातील जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव आयोजित करण्यासाठी मा. श्री. शिवकुमार तेजेराव पाटील यांच्या पुढाकारातून संपन्न झाला. यावेळी शेवाळा गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन, शाळेतील शिक्षक, तसेच गावातील जेष्ठ नागरिक व आदर्श शिक्षक श्री विठ्ठलराव पा. भालेवार, माजी सरपंच अभय्या गोपड, हमीद देशमुख, चंद्रकांत आरसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या काय॔क्रमास गावातील नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष उत्साहपूर्वक सहभागी होऊन काय॔क्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले त्यामुळे गावच्या सरपंच श्रीमती शेषाबाई तेजेराव पाटील यांनी गावातील सर्व नागरिकांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छां दिल्या व कार्यक्रम यशस्वी केल्या बदल आभार मानले.