
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर): दि.२३ ऑगस्ट चंद्रयान मिशन-३ च्या टीमने रचला इतिहास…
परमपूजनीय गोलवलकर गुरुजी देगलूर विद्यालयात याचे थेट प्रक्षेपण सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.सुरेंद्रभाऊ आलूरकर,प्रकाशजी चिंतावार, चंद्रकांतजी रेखावार, विनायकजी मुंडे, संजय पाटील, शंतनू महाराज, रणखांब सर, स्वदीप कॅम्पुटर चे संयोजक वाघमारे सर, संतोष महाजन . केंद्रे सर, दमन देगावकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत या देशाच्या गौरवशाली क्षणाचा आनंद सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी साजरा केला.
चंद्रयान-३ च्या लेंडिंग ची प्रक्रिया आज संध्याकाळी ५:४५ ला सुरू होईल या सूचनेनुसार सर्व विद्यार्थी विद्यालयात एकत्र जमले. लाईव्ह प्रसंग पाहत असताना देशभरातील सर्व नागरिक या ऐतिहासिक घटनेने प्रभावित होऊन आपल्या देशाप्रती असलेले देशप्रेम, आपल्या भारतीय वैज्ञानिकांचा अभिमान प्रकट केले. याप्रसंगी हा आनंद विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आतिशबाजी केली व विद्यार्थ्यांनी जय घोषणा देत चंद्रयान-३ मिशन यशस्वी साजरा केला. हा आनंद सर्व उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून व्यक्त करण्यात आले.