
पाच सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक…
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड ( देगलूर): प्रश्न सीमावर्ती भागाचे…! याबाबत देगलूर आणि बिलोली तालुक्यातील सीमा भागातील विविध विकास विषयक प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्यासाठी याचबरोबर मागील कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत पाच सप्टेंबर रोजी बैठक घेण्याचे ठरले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद या तेलंगाना सीमा भागातील विविध विकास विषयक घडामोडी प्रशासनाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देगलूर आणि बिलोली येथे उपजिल्हाधिकारी आणि प्रमुख समन्वयक यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकांच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रश्न समजून घेण्याबरोबरच तात्काळ सोडवण्याचे नियोजन करण्यात आले होते.प्रश्न सीमावर्ती भागाचे…! दीर्घकालीन नियोजनाच्या आणि अंमलबजावणीच्या कामाबाबत दोन्ही उपविभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्याची ठरले होते. यापूर्वी ठरल्याप्रमाणे तेलंगणा सीमा भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. प्रशासनाच्या अखत्यारीतील प्रश्न तातडीने सोडवण्याच्या अनुषंगाने याचबरोबर विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी च्या विविध बाबीला गती देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि प्रश्न सीमावर्ती भागाचे…! प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी देगलूर येथील उपविभागीय कार्यालयात बैठक होणार असल्याचे देगलूर येथील समन्वयक श्री तात्यासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.