
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : अमरावती विद्यापीठात गेल्या ८ दिवसांपासून लॉ,फार्मसी आणि इंजिनीअरिंगचे हजारो विद्यार्थी कॅरिऑनच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.हजारो लॉ,फार्मसी,इंजिनीअरिंगचे विद्यार्थी सतत कॅरिऑनची मागणी करत आहेत.तरीही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तुषार देशमुख,डॉ.प्रसाद वाडेगावकर यांच्यात कसलीही दमछाक होण्याची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची आक्रमकता दिसून येत आहे.विद्यार्थी हेच या भारत देशाचे भवितव्य आहेत असे आजकाल नेते आपल्या भाषणातून सांगतात.परंतु गेल्या ८ दिवसांपासून कोणत्याही नेत्याने आंदोलनस्थळी भेट दिली नाही.मात्र;राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विनेश आडतिया यांनी त्यांच्या पदाच्या नुकत्याच निवडीनंतर आंदोलक सलग सात दिवस ठामपणे उभे राहिलेले दिसतात.विविध आंदोलने आणि मागण्यांसाठी नेते अतिशय आक्रमक वृत्ती दाखवतात.मात्र;विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या ‘प्रश्ना’साठी एकही नेता पुढे येत नाही.आजही हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विनेश आडतिया मुंबई मंत्रालयात जावून राज्यपाल,मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करणार व न्याय मिळवून देण्याची विनंती करणार आहेत.यासोबतच डॉ.मोना चिमोटे यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.मात्र;विद्यार्थ्यांनी ते मान्य केले नाही.त्याचवेळी विद्यार्थ्यांनी वुई वॉन्ट कॅरिऑन च्या घोषणा दिल्या.