
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा):-तालुका कृषी अधिकारी लोहा व मंडळ कृषी अधिकारी सोनखेड स.आणि पिंपळगाव (ढगे )यांच्यावतीने सन २०२३-२४ या वर्षात राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत सोयाबीन शेती शाळा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, तालुका कृषी अधिकारी श्री एस. एन.पोटपेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन शेती शाळा वर्ग घेण्यात आला. सोयाबीन किड व रोग नियंत्रण तसेच त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री. किरण ढोकळे यांनी केले. सोयाबीन व इतर पिके पावसाच्या खंडामुळे सुकत आहेत त्यावर उपाय योजना व कृषी विभागातील सर्व योजना बाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन गावचे कृषी सहाय्यक श्री जि. एल. बामणपल्ले यांनी केले. यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व रोजगार सेवक व युवा प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.