
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड देगलूर
(देगलूर): आगारात कार्यालयीन कामकाज ही फार मनावर घेवून केले जात नाही. कार्यालयात येण्याची वेळ सकाळी दहा वाजता येण्याची असताना आपले खाजगी कामे करून कार्यालयात येण्याची परंपरा येथे चालत आहे. कोणत्या ही वेळेत या आणि कोणत्या ही वेळेत जा येथे कुणीच कुणाला सगळा विचारत नाही. कारभार अनागोंदी झाला आहे. मालवाहतूक, विद्यार्थी पासेस, डी. ओ. आर, . लेखा शाखेत अतिरिक्त भार आहे म्हणून अतिरिक्त कर्मचारी सोबतीला द्या असेसांगितले जाते. अतिरिक्त देणाऱ्या कर्मचाऱ्यावर भार टाकून मुळ कर्मचारी घरी निघून जातात अशी ही चर्चा आगारात आहे.
ज्या वाहक व चालकांची ड्युटी किमान पंचवीस वर्षे झाली त्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात घेतले तर ते सगळ्याच द्रष्टिकोनातून चांगले असते मात्र देगलूर आगारात दहा वर्षाच्या आत सेवा झालेल्या चालक व वाहकांना कार्यालयीन कामकाजात का घेतले जाते हा सुध्दा एक संशोधनाचा विषय बनला आहे. ३० नवीन बस आवश्यक . देगलूर आगारात सध्या बस आहेत त्यापैकी ५४ किमान १५ बस भंगारात जमा करण्याच्या अवस्थेत असताना त्या चालवल्या जात आहेत. | हा दोष स्थानिक अधिकाऱ्यांचा नाही मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत नवीन बसेस देण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. भंगार बसच्या | व्यतिरिक्त जे बस आहेत त्यांची ही चांगली अवस्था नाही. त्यामुळे देगलूर आगारास किमान ३० नवीन बसेसची आवश्यकता आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर, निलंगा व औसा या आगाराला नवीन बस देवून वर्षे लोटत आहे मात्र नांदेड जिल्ह्य़ात नवीन बसेस देण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी पाठपुरावा करित नाहीत. तिथे अधिकाऱ्यांना काय करायचे आहे. जसे आहे तसे चालू द्या. बोलून वरिष्ठांची नाराजी कशाला ओढवून घ्यायची हे घातकधोरण अधिकारी सुध्दा राबवित आले आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व देगलूरचे माजी नगराध्यक्ष गंगाधर जोशी यांनी दोन महिन्यापूर्वी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर चन्ने यांची भेट घेऊन नवीन बसेस देण्याची मागणी केली होती. मात्र नुसते निवेदन देवून चालत नाही त्यासाठी पाठपुरावा वारंवार करावा लागतो. कोणत्याही पक्षाचे आमदार सोडा राजकारणी मंडळी सुद्धा बसने प्रवास करत नाहीत. बसने प्रवास करण्यासाठी अकरा वेळेस आमदार म्हणून विजयी झालेले दिवगंत आमदार गणपतराव देशमुख यांच्यासारखे आमदार होणे आता नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींना व राजकारणी मंडळींना प्रवाशांना व संबधित कर्मचाऱ्यांना होणारा त्रास त्यांना काय कळणार आहे…