
हरहर महादेवचा गजर शहरात दुमदुमला……
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.. जालना (मंठा )
महादेव भक्त कचरूलाल उर्फ राधे राधे दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण सोमवारी (दि.२८) रोजी निघालेल्या कावड यात्रेत अनेक भाविकांची उपस्थिती होती. या यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मारुती मंदिरापासून सकाळी 9 वाजता निघालेल्या कावड यात्रेत भाविक कावड घेऊन सहभागी झाले होते. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, बम बम का नारा है बाबा एक सहारा है असा गजर करीत कावडकरी शहरातील हेमाडपंथी महादेव मंदिराकडे रस्त्याने जात असताना कावड यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जागोजागी रांगोळ्या काढून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले. येथील महादेव मंदिरात आल्यानंतर महादेवाची भक्ती भावाने पूजा करून महिला भजनात तल्लीन झाल्या होत्या. शहरातून निघालेल्या या कावड यात्रेमुळे भक्तिमय वातावरण तयार झाले होते.