
महसूल विभाग गांधारीच्या तर पोलीस विभाग ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे.. जालना (मंठा)
तालुक्यातील टाकळखोपा येथील पुर्णा नदीपात्रातुन काहींनी ट्रॅक्टरने गावांत वाळुचा साठा करायचा अन् इतरांनी ‘ त्या ‘ वाळू साठ्यांवरुन जेसीबीने टेम्पोत वाळू भरुन जवळपासच्या बांधकामांना चढ्या भावाने विक्रीचा गोरखधंदा राजरोसपने सुरूच आहे. विषेश म्हणजे , वाळू वाहतुकीमुळे टाकळखोपा ते पुर्णा पाटी या रस्त्याची प्रचंड दुरावस्थेबद्दल स्थानिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई होतांना दिसुन येत नाही.
टाकळखोपा ( ता. मंठा ) येथे रात्रंदिवस पुर्णा नदीपात्रातून १० ते १२ ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध वाळू उत्खनन करून गावांतील सार्वजनिक जागेवर साठा करणे , ‘ त्या ‘ वाळू साठ्यांवरुन जेसीबीच्या साह्याने तब्बल २० ते ३० टेम्पोत वाळू भरून १० ते २० कि.मी अंतरावरील बांधकामांना तब्बल ८ ते १२ हजार रुपये ब्रास या भावाने विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे . टाकळखोप्यातील अवैध वाळू उपसा व विक्रीविरुध्द कारवाई न करण्यासाठी महसूलसह अनेकांना महिन्याला प्रति टेम्पो ८० हजारांचा हप्ता मिळत असून त्यांतही कूणाला किती मिळतोय ? या संदर्भात एका दुखावलेल्या वाळू चोरांनी पोस्ट व्हायरल केल्यामुळे ही बाब समोर आली आहे . त्यामुळे ( ता. २७ ) रविवारी दुपारी पत्रकारांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत अंदाजे ४०० ब्रास अवैध वाळू साठा आढळून आला .
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना कारवाईचा सुचना
या बाबत अप्पर जिल्हाधिकारी हदगल साहेब यांना विचारले असता , टाकळखोपा येथील अवैध वाळू उपसा व विक्रीविरुध्द तात्काळ करण्याचे आदेश मंठा तहसीलदार रुपा चित्रक यांना दिल्याचे सांगितले .