
दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड (पेठवडज):- आज पेठवडज ता.कंधार येथे “कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार संचालक मंडळाची निवडणूक वर्ष २०२३”निमित्त भारतीय जनता पार्टी- शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे पुरस्कृत “बळीराजा परिवर्तन पॅनल” ची बैठक पार पडली या बैठकीत पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी कंधार लोहा भाजपा विधानसभा प्रमुख भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, राष्ट्रवादीचे युवा नेते शिवकुमार भोसीकर, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड ॲड. मारुती पंढरे , अंगदराव केंद्रे, साईनाथ पा. कपाळे,यादवराव चिवडे,शिवराज पाटील, पंजाबराव वडजे, सरपंच दत्तात्रय गायकवाड, चेअरमन व्यंकटराव पांढरे, बालाजी पा. वडजे तळ्याचीवाडीचे मा. सरपंच व्यंकट गर्जे सह पॅनलचे सर्व उमेदवार, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.