
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर)- विद्यार्थ्यांना आपले सण समारंभ व संस्कृती याची ओळख होऊन त्याचे जतन करण्याची सवय शालेय स्तरापासून लागावी या अनुषंगाने येथील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल मध्ये वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शालेय व्यवस्थापन समिती देखील नेहमी प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून शाळेत रक्षाबंधन व राष्ट्रीय क्रीडा दिन मोठा उत्साहात पार पडला . यावेळी शाळेत एका खास असेम्ब्लीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रार्थना, सुविचार,नवीन शब्द,समूह नृत्य,समूहगीत गायन , सामान्य ज्ञान ,शिक्षक संवाद, राष्ट्रगीत, सूत्रसंचालन इ.चा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला शालेय वाद्यवृंदाने प्रार्थना सादर केली .त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी या खास असेम्ब्ली मध्ये आपले सादरीकरण केले-
सुविचार -आरोही पुंजरवाड, नवीन शब्द – काव्यांश पाटील, २९ चा पाढा -श्रीशा वडजे,भारतीय संविधान उद्देशिका -शिवशंकर येरमुने , सामान्य ज्ञान प्रश्न – श्रावणी लगडे,कविता सादरीकरण- प्रीती खांडेकर. या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमेस शाळेचे प्राचार्य श्री.सचिन कोल्हे , उपप्राचार्य श्री.महेश बरे यांनी पुष्पहार अर्पण केला व रक्षाबंधन, राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या . शिक्षक संवाद या मालिकेत क्रिडा शिक्षक श्री.आकाश येनवाल यांनी मेजर ध्यानचंद सिंग यांचे हॉकी खेळाबद्दल असलेले कौशल्य व सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेले सुवर्ण पदक या बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अजका सय्यद आणि अनुशा शेख यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.जयश्री हांडे,श्री.राहुल कदम ,श्री पवन कांबळे,श्री.साईगणेश भातनाते,श्री.शेलेंद्र कुकडे,श्री.सुभाष मरखेले यांनी विशेष परिश्रम घेतले.