
दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर):देगलूर तालुक्यांतील रिक्त असलेल्या कोतवाल पदांच्या ८० टक्के मर्यादेमध्ये पदे भरण्याबाबत शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. सहा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कोतवाल भरती समिती, देगलुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१.०८.२०२३ पंचायत समिती सभागृह, देगलुर येथे तालुक्यांत रिक्त असलेल्या १५ सज्जातील ८० टक्के मर्यादेमध्ये १२ पदाची सोडत काढण्यात आलेली आहे. सदर सोडतीमध्ये देगलुर तालुक्यांतील खालील तलाठी सज्जासाठी जातीनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे.
१. खानापुर भटक्या जमाती व २. भुतनहिप्परगा विशेष मागास प्रवर्ग महिला ३. माळेगांव
(म) आर्थिक दृष्टयांदुर्बल घटक ४. बळेगांव आर्थिक दृष्टयांदुर्बल घटक (महिला) ५. दावणगीर
खुला प्रवर्ग ६. झरी खुला प्रवर्ग ७. तडखेल खुला प्रवर्ग ८. सुगांव खुला प्रवर्ग ९ देगांव बु. खुला (महिला) १०. वळग खुला (महिला) ११. नरंगल बु. खुला प्रवर्ग १२. चैनपुर खुला प्रवर्ग वरील प्रमाणे १२ सज्जाची आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. सदर आरक्षण सोडतीसाठी रिक्त असलेल्या तलाठी सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व सरंपच तसेच तालुक्यांतील नागरीक उपस्थित होते.