
गेले वर्षी चा ७५ टक्के व या वर्षी चा २५ टक्के पिक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी…
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड जिल्हातील शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमी संकटाचा सामना करावा लागतो कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. तसेच शासनाच्या वतीने नेहमी डोळे झाक केली जाते. गेल्या वर्षी तीन हेक्टर पर्यंत १३ हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले होते पण आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत फुकट च्या घोषणा करून सोडण्यापेक्षा दोन रुपये शेतकऱ्यांना कसे मिळतील यावर शासन दरबारी विचार झाला पाहिजे गेल्या वर्षी २५ टक्के पिक विम्याची रक्कम मिळाली होती. परंतु आतापर्यंत ७५ टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच यावर्षी २१ दिवसाचा पावसाचा खंड पडला असून शासनाने २५ टक्के पिक विमा रक्कम देण्याची आजपर्यंत तसदी घेतली नाही शेजारील परभणी जिल्हामध्ये पीक विम्याची २५ टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे तेंव्हा नांदेड जिल्हातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षीचे अनुदान व या वर्षीचा पिक विमा तसेच गेल्यावर्षी चा पिक विमा देऊन शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचा विचार करावा तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.