
अतिवृष्टीमुळे सणावर होणार परिणाम…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर ); महाराष्ट्रात बळीराजा म्हणजेच शेतकन्यासाठी आनंदाचा उत्साहाचा सोहळा म्हणजे शेतात राब राब राबणाऱ्या बैलांचा उत्सव पोळा सण आहे. बैलांच्या कष्टातून उतराई होण्यासाठी शेतकरी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण यावर्षी अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडल्याने याचा परिणाम साहित्य खरेदीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. देगलूर शहरांमध्ये साहित्य विक्रीची मोठे दुकाने असून दुकानदारांनी आपली दुकाने साहित्याने सजवली आहेत.
पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य दुकानांमध्ये दरवर्षी गर्दी पाहायला मिळते. पण या वर्षी एक महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने व त्यामध्येही पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे. शेतकयांनी शेतामध्ये खर्च करून शेतीमध्ये मोठी नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय.
यामुळे आर्थिक टंचाईमध्ये शेतकरी आपलं जीवन जगत असताना काही दिवसावर येऊन ठेपलेला बैलपोळा सणावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आज बाजारपेठेमध्ये दिसत आहे. दुकानदारांनी आपले दुकाने सजवले असले तरी म्हणावी
तेवढी गर्दी बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत नाही. त्यातली त्यात सध्या ट्रॅक्टर द्वारे शेती केली जाते बैल सांभाळणारे शेतकरी ही कमी झाल्याने खरेदीचा उत्साह वरचेवर कमी दिसत आहे. यामुळे अनेकजण केवळ प्रथा म्हणूनच हा सण साजरा करताना दिसतात. तर शेतकरी मात्र शेतात आपल्यासोबत घाम गाळणाच्या सर्जा-राजासाठी उधार-उसनवार करून सण साजरा करणारच असल्याचे दिसते.
यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्याचा परिणाम व्यवसायावर होतोय. यामध्येच चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळा सणावर जास्त दिसत आहे. अगोदरच बैल जोड्या सांभाळणारा शेतकरी कमी झाला आहे. तांत्रिक युगाकडे शेतकरी जात असून याचा परिणाम पारंपरिक सणावर पडतो. काही जणांकडे तर एकच बैल दुसऱ्या शेतकन्यासोबत सावड करून त्याचा एक बैल घेऊन शेती करताना पाहायला मिळत आहे. देगलूर शहरातील बाजारपेठेमध्ये बैल पोळानिमित्त खरेदी साठी गर्दी आज कमी असली तरी आणखी दिवस बाकी आहेत. शेतकरी बैलपोळा उत्साहात साजरा करतात त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये विक्री चांगली होईल. यामध्ये व्यवसाय होईल अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. दरामध्ये फारशी वाढ नसून स्थिर आहे.