दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शांततापूर्ण पार पडले असून गेल्या दहा दिवसांपासून श्री गणेशाची पूजा,अर्चना,प्रसादाचा भोग,आरती,भजनाने संपूर्ण जिल्हा दणाणून गेला होता.अनंत चतुर्दशीला (दि.२९ व ३०) या दोन दिवसांमध्ये गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…” च्या गजरात निरोप दिला.जिल्हाभरात विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर व पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समिती सदस्य,सार्वजनिक गणेश मंडळे व नागरिकांचे सहकार्य लाभले.संपूर्ण जिल्हाभरात श्री गणेशाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात,गुलालाची उधळण करीत यावेळी भक्तीभाव वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.