
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी करणार नाहीत”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बळी गेलेल्या शत्रुघ्न काशीद यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईक व सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे*
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मागणीवर ठाम राहिले. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शत्रुघ्न काशीद यांचा मृतदेह शेवपेटीत ठेवून अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणारच नाही असे असे नातेवाईक व सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.