
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
अंबाजोगाई येथील आशिया खंडातील नामांकित दवाखान्यांपैकी एक दवाखाना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय हॉस्पिटल हे असून अंबाजोगाईतील पंचक्रोशीतील तसेच शेकडो किलोमीटर पासून रुग्ण या दवाखान्यात येतात, या दवाखान्यात रोज रुग्णांना रक्त लागत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा सतत भासत असतो याचीच जाण ठेवून टायगर ग्रुप चे जिल्हा संपर्कप्रमुख श्री कोंडीराम पवार यांनी उमेश भैय्या पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते. सदर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांचा लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गौरक्षक उमेश भाऊ पोखरकर, प्रमोद भैया पोखरकर, संतोषजी काळे व इतर उपस्थित होते.