
आमच्या पाठपुराव्याला प्रचंड यश- समिर शिरवडकर- माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र सचिव..
समिर शिरवडकर – रत्नागिरी
राजापूर :- राजापूर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापुर साठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्टीय आरोग्य विभाग च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य विभाग जैतापूर, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी नवीन प्राथमिक केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे यासाठी तब्बल ४ कोटी ६२ लाख निधी मंजूर झाला आहे.
कित्येक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी निवास च्या इमारत राहण्या योग्य नसल्याने येथे डॉक्टर,परिचालीका,आणि इतर कर्मचारी वर्ग हे या केंद्राच्या बाहेर वास्तव करीत होते.आणि रात्री अपरात्री रुग्णालयात कोण नसलेने रुग्णांचे हाल होत होते.विभागीय जनतेने वारंवार निवासी परिचालीका आणि डॉक्टर यांची मागणी करूनही इमारती ची दुरवस्था असलेने येथे कोणीही राहू शकत नव्हते.रात्री च्या वेळेस गरोदर महिलांच्या बाबतीत सुद्धा निवासी परिचालीका नसलेलं ही समस्या होतीच.या साठी परिसरातल्या ग्रामस्थांनी,लोकप्रतिनिधी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. आठले साहेबांशी पत्रव्यवहार आणि गाठीभेटी च्या माध्यमातून पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुरावा यश येऊन निवासी डॉक्टर आणि निवासी परीचालीका याच्या निवासस्थानाची व्यवस्था झालेने हा प्रश्न कायमचा सुटला अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.सदर बांधकाम चे इ-टेंडरिंग झालं आहे आणि याची मुदत ही एक वर्षाची आहे.लवकरच काम सुरू होऊन निवासी डॉक्टर आणि निवासी परीचालीका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाचा विषय मार्गी लागून रात्रीच्या वेळीस रूग्णचे होणारे हाल थांबतील.