
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):शालेय जीवनातील आठवणी या खूप आनंद देणाऱ्या असतात,एकदा ती वेळ गेली कि,प्रत्येक जण आपआपल्या प्रपंचात रमबाण होतो. कधीतरी मात्र ते दिवस आठवतात, काही आठवणींनी जुन्या मित्रांना भेटण्याची हूर लागते. कचरवाडी (ता.इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १९८४ मधील शिकणाऱ्या मुल-मुलांनी पुन्हा एकत्र येत स्नेह मेळावा आयोजित करून पुन्हा ह्या आठवणींना उजाळा दिला.शालेय जीवनातील संगती विविध ठिकाणी वास्तव्यास असूनही,या स्नेहमेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित झाले आणि त्यांचा तो दिवस विशेष संस्मरणीय ठरला.
कचरवाडी येथील १९८३-१९८४ मध्ये शिकत असलेले ३०-३५ जण दि.११ नोव्हेंबर रोजी एकत्र जमले होते. हा मेळावा माजी निवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक गुरूजी मारूती निवृत्ती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.४० वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी जमा झाल्या असल्याने अनेक प्रसंग यावेळी मांडून त्या जीवनातील गोड कडू आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला गणपत बनसोडे, तात्यासाहेब बनसोडे, महादेव बरळ, संतोष गदादे, सरपंच पैलवान कुंडलिक कचरे, बाबासाहेब कचरे,तात्यासाहेब कचरे, रोहिणी मोहिते, सुनील मोहिते, रामचंद्र कचरे, शिवाजी देवकाते, नामदेव कचरे, तुकाराम ठोंबरे, राहुल बनसोडे आदी आजी-माजी मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.