दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी -माधव गोटमवाड
नांदेड / कंधार – –
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध
असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथे श्री श्री आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी प्रतिष्ठाण मंदीराचा भूमिभूजन सोहळा गुरुवर्य गयबी नागेंद्र महाराज मठसंस्थान पानभोसी यांच्या कृपा आशीर्वादाने श्री. किरण महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते.श्रीक्षेत्र माळेगाव येथील पावन भूमी मध्ये या तुळजाभवानी देवीचे भव्य असे मंदिर उभारले जाणार असून त्याचे भूमीपूजन दि २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले
यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श ग्रामपंचायत माळेगाव चे विद्यमान सरपंच – हनमंत रुस्तुमराव धुळगंडे होते . सूत्रसंचालन अंतेश्वर फुगनर सर यांनी केले तर आभार किरण महाराज यांनी मानले.
यावेळी उपस्थित बालाजी पाटील सरपंच लिंबाचीवाडी,पंडीतराव वारकड ,राधाकिशन फुगनर,नागोराव वाघमारे,प्रभाकर धुळगंडे,गोपाळ पाटील,राहुल माडगे,पंडीत पपलवाड,एकनाथ बोईनवाड, मयूर महाराज , नागोराव संभाजी मुंगरे,रमेश महाराज ,पांडुरंग धुळगंडे ,माधव गोटमवाड,संतोष कांबळे आदीसह या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
