प्रतिनिधि/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
भारत गौरव रेल्वेमध्ये येत असलेल्या ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे.ही रेल्वे चेन्नई वरून पुण्याकडे येणारी होती.सध्या रेल्वे मधे असणाऱ्या पेन्ट्रीकार काढून टाकलेल्या आहेत.यामुळे प्रवाशांना सकाळी पॅक केलेले पॅकेटफूड चं संध्याकाळी देण्यात येते. या रेल्वे मध्येही असेच पॅकेट फूड प्रवाशांना देण्यात आले होते.
त्यातूनच ही विषबाधा झाली आहे असे सांगण्यात आले.ही रेल्वेगाडी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यामध्ये आली.तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म वरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार सुरू करण्यात सुरूवात करण्यात आली.व पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात ४० बेड तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती देण्यात आली. रेल्वेतील पेन्ट्रीकार बंद झाल्या मुळे शिळे झालेले अन्नपदार्थ खावे लागतात त्यामुळेच विषबाधा होण्याची शक्यता असते.रेल्वेने पुन्हा पेंन्ट्रीकार सुरू कराव्यात असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
